'सृजनशील पालकत्व' मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार

Dhak Lekhanicha
0

 'सृजनशील पालकत्व' मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार



शिरूर (प्रतिनिधी) –सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)

सद्गुरु श्री वामनराव पै निर्मित जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र शिरूर यांच्या वतीने शिरूर नगरपरिषद हॉलमध्ये 'विद्यार्थी-पालक मेळावा' नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी 'सृजनशील पालकत्व' या विषयावर जीवनविद्या मिशनचे विश्वस्त मा. चंद्रकांतजी निंबाळकर यांनी अत्यंत मार्मिक व मनस्पर्शी मार्गदर्शन केले.


निंबाळकर सरांनी बालपालनातील वयाचे टप्पे उलगडून दाखवत सांगितले की, "वय ५ पर्यंत लाड, ५ ते १५ शिस्त, आणि १५ नंतर मैत्री" हे तत्व ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यासासाठी सद्गुरुंचा 3R फॉर्मुलाही त्यांनी समजावून दिला. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मोजक्या पण समर्पक उत्तरांनी समाधान दिले.


या वेळी एमपीएससी, NEET व विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. धनश्री गायकवाड, सिद्धी बढे, कुणाल कुरुंदळे, राज टाकळकर, ग्रंथाली कोकरे या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.


कार्यक्रमात प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे, मुख्याध्यापिका स्वाती थोरात, तसेच महेशभाऊ रासने, इंद्रभान गायकवाड, विठोबा दादा निंबाळकर, संजय फंड, चंद्रशेखर पाटील आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याशिवाय वैभवी पतसंस्थेचे संचालक व रांजणगाव, नागरगाव, शिक्रापूर उपकेंद्रांतील पदाधिकारी उपस्थित होते.

शाखाध्यक्ष रोहिदास काळे यांनी प्रास्ताविक केले, रोहिणी जावळे व चंदना लोखंडे यांनी संयोजन केले, तर संगीता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. जावळे काका-काकू व बेबीताई शितोळे यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. विजेत्यांना जीवनविद्येचे ग्रंथसेट भेट म्हणून देण्यात आले.


कार्यक्रमाचा समारोप विश्वप्रार्थना आणि जीवनविद्येच्या स्फुर्तीगीताने करण्यात आला.

दर बुधवारी सायंकाळी सुरजनगर येथील साई मंदिरात जीवनविद्या सत्संग घेतला जातो तसेच प्रत्येक रविवारी मोफत बालसंस्कार वर्ग आयोजित केले जातात. शिरूर पंचक्रोशीतील नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!